picture picture
January 18, 2012 Marathi Lyrics, Music 46 Comments

Lyrics of Marathi song – Labhale Amhas Bhagya Bolato Marathi (लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी) | Marathi Abhiman geet | मराठी अभिमान गीत

मराठी अभिमानगीताचा दुवा आपल्याला देत आहे. आपण जरूर ऐकावं, आवडलं तर आपल्या मित्रांनाही तो आनंद द्यावा. मराठीचा अभिमान जागृत करायचा असेल तर एक अहिंसक व्यासपीठ असणंही गरजेचं आहे, आणि संगीतापेक्षा संयुक्तिक माध्यम आणखी काय असू शकतं. अमराठी लोकांना आपल्या भाषेचा आदर करायला सांगण्याआधी मराठी लोकांमध्ये अभिमान जागृत करण्याची अधिक गरज आहे. सुरेश भटांचे शब्द ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५० हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत बाकी काही नाही तर एक चैतन्य जरूर निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रगीताबाबत आपण एक चूक केली. ५० वर्षांमध्ये आपण या गीताशी रोजचा संपर्कही ठेवला नाही. आज मराठीच्या दुरवस्थेला आपली अनास्था हे एक मोठं कारण आहे. ही चूक आपण (मराठी माणसं) मराठी अभिमानगीताबाबतीत करू नये असं मला वाटतं. आपल्या माध्यमातून आपण हे मराठी अभिमानगीत पोचवलंत तर आमच्या कार्याला मदत होईल. धन्यवाद- कौशल इनामदार

मराठी अभिमान गीतmarathi asmita - marathi abhimaan geet
संगीतकार : कौशल इनामदार
गीतकार : सुरेश भट

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी

दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी

Click here to download MP3 song Labhale Amhas Bhagya Bolato Marathi (लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी)

Tags: , , ,

46 Responses to “Lyrics of Marathi song – Labhale Amhas Bhagya Bolato Marathi (लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी) | Marathi Abhiman geet | मराठी अभिमान गीत”

45 Comments

  1. iteshree date says:

    hey gane pratekala apan marathi asnyache bhan karoon dete v aplya att supta bhavanana jagrook karte.

    • sandy says:

      हो खरच ..खूप अप्रतिम गाणे आहे .. मस्त संकल्पना आहे कौशल इनामदार ह्यांची.
      इतेश्री आपल्या comments दिल्या बद्दल धन्यवाद!! 🙂

      • Khupach chan gaana ahe… I was searching for this song since when.. and finally i gt it..!! Luv this song..!!! <3 My favourite..!! Thankz Sandeep Kadam..!!

      • anand says:

        aho kalpana changali ahe pan he palpute shevatacha kadava ka galtat te kalat nahi

        • sandy says:

          @Anand konte shevatche kadva? I don’t think if anything is missing?

        • कुणालाही पळपुटं म्हणायला एक क्षण लागतो. हे गीत का तयार झालं आणि शेवटचं कड्व का गाळलं यामागे काही कारण आहे. मतभेद असू शकतात पण कुठल्या भाषेत ते आपण व्यक्त करावे याचा विचार ज्याने त्याने करावा. आपल्या मताचा आदर करून आपल्या प्रश्नाला खाली उत्तर दिलं आहे. कृपया एकदा वाचण्याची तसदी घ्यावी.

          http://kaushalkatta.blogspot.in/2013/03/blog-post.html

  2. Amey says:

    Superb lyrics…mastach

  3. mayura says:

    shevatch ani atyant sundar kadva yat nahi yacha khed vatato!

    • sandy says:

      धन्यवाद मयुरा, तू अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, मला लक्ष्यात आले ते कडवा आणि आता मी ते update केले आहे.

    • शेवटचं कड्व न घेण्यामागे एक कारण आहे. त्याचा दुवा खाली देत आहे. यावर खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. खेद वाटायला एक क्षण लागतो. हे गाणं तयार करायला दीड वर्ष लागलं. त्यामुळे खात्री बाळगा की अत्यंत विचारपूर्वकच सगळे निर्णय घेतले असतील. यात मतभेद असू शकतात. पण किमान माझा दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचायला हवा असं मला वाटतं.

      http://kaushalkatta.blogspot.in/2013/03/blog-post.html

      यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले.
      त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या? त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.

      पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
      आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
      हे असे कितीक खेळ पाहते मराठी
      शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

      आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकररता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. मूळ कविता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान कधीतरी कविवर्य सुरेश भटांनी लिहिली होती. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात ही कविता प्रथम छापून आली होती. तेव्हां या चार ओळी लिहिल्याच गेल्या नव्हत्या.

      त्यामुळे इथे पहिला ठळक मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की मूळ कवितेमध्ये या ओळी नव्हत्या !

      पुढे १९८०च्या दशकात सुरेश भटांच्या एका कायाक्रमात (ज्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते) या चार ओळी भटांनी म्हटल्या. आज आपल्याला सुरेश भटांच्या आवाजात ज्या ओळी ऐकू येतात त्या याच कार्यक्रमातल्या आहेत असा माझा अंदाज आहे. म्हणजे मूळ कवितेनंतर साधारण २० वर्षांनी या ओळी सुरेश भटांनी लिहिल्या !
      पण त्यानंतरच्या ‘रूपगंधे’च्या कुठल्याही, अगदी, शेवटच्या आवृत्तीतसुद्धा या ओळी आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण काय असावं ?

      खुद्द सुरेश भटांनीसुद्धा या ओळी छापील स्वरूपात जनतेसमोर का येऊ दिल्या नाहीत ?

      मला असं वाटतं की ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ते ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ (म्हणजे जी मूळ कविता आहे) ती अत्यंत चिरंतन आहे. पण ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ ही परिस्थिती काही चिरंतन नाही. आणि ती तशी असावी असं आपल्याला खचितच वाटत नाही ! ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ हे आज जरी सत्य असलं तरी ते सत्य चिरकाल टिकणारं नाही आणि ते आपण तसं राहू देता कामा नये. ही परिस्थिती आज न उद्या बदलेल, पण ‘येथल्या चराचरात राहते मराठी’ हे सत्य चिरंतन आहे अशी माझ्या मनाची धारणा आहे. मराठी अभभमानगीत हा मराठीचा ऍन्थम (स्फूर्तिगीत या अर्थी) आहे आणि कुठल्याही ऍन्थममध्ये क्षणिक सत्याला वाव नाही. उदाहराणाथा, ‘जन गण मन’ किंवा ‘वंदे मातरम’ मध्ये ‘भारत किती गरीब देश आहे आणि भ्रष्टाचार कसा विळखा घालून भारतवासीयांच्या मानगुटीवर बसलाय’ असं आपण म्हणू का ?

      मराठी ‘अभिमान’गीत म्हणायचं आणि मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असंही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं.

      ‘रूपगंधा’ची नवीन आवृत्ती काढून पाहिलीत तरी तुम्हाला या चार ओळी दिसणार नाहीत की इयत्ता सहावीच्या पुस्तकात या ओळी आपल्याला आढळणार नाहीत. खुद्द कविवर्य सुरेश भटांनाही या ओळींमध्ये दर्शवल्या गेल्या क्षणिक परिस्थितीची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी त्या ओळी म्हटल्या पण कधीही छापू दिल्या नाहीत !

      आणि याच कारणासाठी मी या चार ओळींना चाल दिली. काही कार्यक्रमांतून मी या चार ओळी म्हणतो देखिल पण त्या ओळी ध्वनिमुद्रित केल्या नाहीत. मराठी भाषा चिरकाल राहणार आहे पण मराठीवर आलेली बिकट परिस्थिती ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी क्षणिक आणि तात्कालिकच राहिल – या माझ्या विश्वासातून हा निर्णय घेतला गेला !

  4. Marathi Bharati says:

    Pahilyanda Sarvana Jagtik Marathi Dinacha Shubhecha.

    Thanks for uploading this song…… i love this song all time.

    this song talks @ marathi & that’a lot for me.

    thanks again

  5. YOGESH WALUNJ says:

    hats off!!!
    gr8 done,v r alwys wid yu…….

  6. शिवसेना नगर जिल्हा says:

    “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी…!!”

    खूपच अप्रतिम असे मराठी अभिमान गीत आहे..
    माझ्याकडे शब्द कमी पडेल असे गीत बनविले आहे तुम्ही…
    जय मराठी…मी मराठी…

  7. Varun Nambiar says:

    Thank you for the song 😀
    Jaanto Marathi! Maanto Marathi!

  8. Rahul Vaidya says:

    One of the most fantastic songs, thanks for lyrics
    I sit in mh car for office and i have to start my music only with this song

  9. rohan says:

    Hi Sandy,

    Sundar rachana ahe hya kautukaspad ganyachi,

    Amala daroroj aikala khup avade he gane.

    kyupaya hyachi MP3 Milel ka amhas.

  10. ANIL THENGARE says:

    Marathi jivant hoti, Aahe, Aani Rahil..
    Pruthvi aahe toparyant Jivant aahe MARATHI

  11. urmila veerpatil says:

    khupach sundar ganna aahe………………marathi asmita dakhwnara…ani aapan marathi aahot yacha abhimaan darshvinara………hey ganna banvilya baddal mi kushal inamdar yanchi abhari aahe

  12. nilam sahil kamble says:

    labhale aamhas bhagya aamhi bolto marathi akato marathi..
    khup sundar ase he bol aahet.aani tyahun ek spurti nirman hote aaplya ya may boli vishayee.

  13. Yogesh Ulhalkar says:

    Ek Rashtra Geet ani He Maharashtra Geet ! Abhiman ahe amhas MARATHI
    aslyacha .

  14. AMAR SHINDE says:

    Really I enjoy this song whenever I am listening this song I fell very nice. Infact I dont have words for this song how much i like. I love it so much.I am always singing this song.Thanks to Kaushal Dada You are great person.

  15. Snehal M. Shekatkar says:

    Apratim!!

  16. amogh mehendale says:

    No doubt awsm writing….
    Y did recording have not incld last stanza of song????

  17. Ravindra Waradkar says:

    Marathi bhashechi asmita fulavnari aani Marathi bhashabhiman jagavnari Marathi bhasheche mahanmangal stotra. roj mhana.

  18. xyz says:

    khup ch sundar geet!

  19. Ketan Barge says:

    या गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत… आपण मराठी असल्याची नुसती जानीव होउन राहत नाही, तर अभिमान दाटून येतोय… इतके छान बोल आहेत गाण्याचे… मला खुप आवडल…

  20. pooja kasbe says:

    Khup chhan gaan ahe, jr mla hi he gaan ganyachi sandhi milali tr mi te manapasun gain. Khup sundr ahe.
    – pooja kasbe

  21. rushabh kulkarni says:

    garv ahe mala mi marathi aslyacha

  22. Sonali panchal. says:

    Kharch khup mast song aahe.

  23. समीर सकपाळ says:

    लाभले आम्हास भ्याग बोलतो मराठी…ह्या पहिल्या ओळी त च मना मध्ये एक अभिमान प्रकट होतो.आणि ह्या गाण्याची रचना करणारे सुरेश भट यांना आमच्या सर्व मराठी रासिंकांकडून आभार व्यक्त करतो.

    आपली मराठी भाषा अशीच जागृत आणि समृध्द राहो आणि राहणारच.

    आणि शेवटच्या चार ओळी गाण्या मधून काढल्या असल्या तरी काही प्रोब्लेम नसावा .

    • sandy says:

      श्री समीर सपकाळ आपण आपल्या प्रतिकीय दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे .
      मी खूप भाग्यवान आहे कारण श्री कौशल इनामदार स्वता माझा ब्लॉग फ़ोल्लो करता . श्री समीर आपण जर वरील श्रोत्याच्या प्रतिकिया वाचल्या असतील तर आपल्याला लक्ष्यात येईल कि कौशल इनामदार ह्यांनी स्वत त्याचे उत्तर दिले आहे कि का शेवटच्या चार ओळी का काढले ते.

      धन्यवाद !

  24. Reshma says:

    My Marathi mast

  25. Sanjay Anant Deo says:

    Sarva marathi Jananna Marathi Bhasha Dinachya Haardik Shubheccha.Mala Marathi aslyacha abhiman ahe.Amchya romaromat,shwasat vasate marathi.Abhiman geetat mhatlyapramane kharech “Labhale Bhagya Amha Bolato Marathi”

  26. sandeep says:

    Manapasun dhanyavad. Khup shodhat hoto he song pan milat navate. Realy thanks sandy.

  27. Avinash Jadhav says:

    खु प छा न !!!!!!!!!!!!

  28. praful thakur says:

    Maaan shan fkt marathi……….
    Garv Aahe mla mi MARATHI aslyacha…..

  29. Nitish Vinayak Khanvilkar. says:

    गीताचे शब्द आणि संगीत दोन्ही अतिशय उत्तम.

  30. Ninad Tajanpure says:

    Great for us….

  31. Dnyaneshwar Bhosale says:

    khup changla upakram ahe …

Leave a Reply

Name

Mail (will not be published)

Website