picture picture
November 5, 2011 Marathi Songs, Music 1 Comments

Bhijun gela vaara (भिजून गेला वारा) – Video / MP3 download song

चित्रपट : इरादा पक्का
दिग्दर्शक : केदार शिंदे
कलाकार : सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, स्मिता जयकर, कमलाकर सातपुते, शलाका पवार
संगीतकार : निलेश मोहरीर
गीतकार : अश्विनी शेंडे

Lyrics of song – Bhijun gela vaara (भिजून गेला वारा)

Video Song – 

Download Mp3 Song:

Click title to download –  Bhijun gela vaara (भिजून गेला वारा) (381 downloads)

November 5, 2011 Marathi Lyrics, Music 3 Comments

Lyrics of Marathi song – Bhijun gela vaara (भिजून गेला वारा)

चित्रपट: इरादा पक्का
भिजून गेला वारा – क्षितिज तारे, निहीरा जोशी – इरादा पक्का
गायक: क्षितिज तारे, निहीरा जोशी
संगीतकार: निलेश मोहरीर,
गीतकार: अश्विनी शेंडे

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू, ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
चाहूल हलके दे ना

झिम्माडं पाऊस, तू नको जाऊस
चुकारं ओठ हे बोले
श्वासातं थरथर, सरीवर सर
मन हे आतूर झाले
ये ना जरा तू, ये ना जरा
मिठीत हलके घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
मिठीत हलके घे ना

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला

स्पर्शात वारे, निळे पिसारे
आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू
कसे दोघात जग हे न्हाले
ये ना जरा तू, ये ना जरा
मिटून डोळे घे ना जरा
ये ना जरा तू, ये ना जरा
मिटून डोळे घे ना

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला…

Click here to download MP3 song of Bhijun gela vaara (भिजून गेला वारा)

November 3, 2011 Kavita / Poems 6 Comments

Kiti chan asta na (किती छान असतं ना ?)

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..

कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं ……..
— Ek Kavi..

November 3, 2011 Kavita / Poems 1 Comments

Prateykachya Mannat (प्रत्येकाच्या मनात…)

प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता…..

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ……….

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती……………

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या………

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे…….

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण………..

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही………
— Ek kavi…

November 3, 2011 Kavita / Poems 0 Comments

Maitri (मैत्री…)

मैत्री म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक शांती,
एक सुखद सहवास, एक निस्वार्थ नात
एक आपलेपण,
एक आकर्षण,
एक अतूट प्रेम,
एक आठवण, कोणीतरी आपल असण्याची जाणीव
मनाला लागणारी हुरहूर,
एक कधीही न तुटणार नात,
मनातल दु:ख व्यक्त करण्याची जागा
एक उत्साह,
भेटल्यावर चेहऱ्यावर उमटणारा आनंद …..म्हणजे मैत्री.

— Ek Kavi…