ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
कधी ना विसरणारी ती
कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
कधी ना विसरणारी ती
कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं ……..
— Ek Kavi..
प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता…..
प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ……….
प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती……………
प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या………
प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे…….
प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण………..
प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही………
— Ek kavi…
मैत्री म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक शांती,
एक सुखद सहवास, एक निस्वार्थ नात
एक आपलेपण,
एक आकर्षण,
एक अतूट प्रेम,
एक आठवण, कोणीतरी आपल असण्याची जाणीव
मनाला लागणारी हुरहूर,
एक कधीही न तुटणार नात,
मनातल दु:ख व्यक्त करण्याची जागा
एक उत्साह,
भेटल्यावर चेहऱ्यावर उमटणारा आनंद …..म्हणजे मैत्री.
— Ek Kavi…
तुझ्या लपलेल्या आठवणीना
परत कधी शोधणार नाही
तुझ्या जपून ठेवलेल्या
त्या अनमोल शिदोरीला
आता कधी सोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!