Lyrics of Marathi song – Abhas Ha (आभास हा) | Yanda Kartavya Aahe movie | यंदा कर्तव्य आहे
Song: आभास हा
Artist: वैशाली सामंत, राहुल वैद्य
Composer: निलेश मोहरीर
Lyrics: अश्विनी शेंडे
Album/ Movie: यंदा कर्तव्य आहे
कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती
मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे
तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
Click here to download MP3 song of Abhas Ha (आभास हा)
Tags: lyrics, marathi, marathi lyrics, movie, mp3
this is my favorite song…….
pls give permission to copy these lyrics
I have emailed you thanks 🙂
MALA YA GANYACHE MARTHI BOL PAHILET PLS SEND KARA