एखादा क्षण असाही येतो
एखादा क्षण असाही येतो
मोहरून मनाला,
शहारून जातो..
एखादा क्षण असाही येतो
हुरहूर लावून एकांत देतो..
एखादा क्षण असाही येतो
विजयाचा आनंद देऊन जातो..
एखादा क्षण असाही येतो
वेदनेची झाल पांघरून जातो..
एखादा क्षण असाही येतो
आभाळ कवेत भरून जातो..
एखादा क्षण असाही येतो
मनाचा गाभारा रिता होतो..
एखादा क्षण असाही येतो
हास्याचे कारंजे फुलवून जातो..
एखादा क्षण असाही येतो
काहूर माजवून रडवून जातो..
एखादा क्षण असाही येतो
सुगंध कस्तुरीचा दरवळून जातो..
एखादा क्षण असाही येतो
बहर फुलांचे टाळून जातो..
एखादा क्षण असाही येतो
रंगांचे ऋतू सांडून जातो..
एखादा क्षण असाही येतो
पाकळ्या मनाच्या गाळून जातो…
nice marathi kavita
romantic marathi kavita plz send me
nice kavita
मला तुमच्या सगळ्या कविता आवडल्या आहेत.
All your poem are very nice.
MAST NA DOST KAVITA……..YARRRRR
ऐक क्षण असाही यावा,मनातील सर्व स्वप्ने पूर्ण करून जावा,,,,,
खूप सुंदर लिहिता. अभिनंदन आणि शुभेछा…