कधी-कधी तुझ्या ओठांवरचा ओलावा मला दुष्कालातल्या पानाव्थ्यावरचा एक थेंब वाटतो
तर कधी थंड दुधावर्ती तरंगणारी मंद-मंद साय वाटते.
कधी-कधी भाजार्या उन्न्हात ओठांना गारवा देणारा लाल-बुंद गरीगारचा गोळा वाटतो,
तर कधी गरम-गरम कॉफीवर जमलेल्या फेसाळ बुड-बुडयांचा मेळा वाटतो.
कधी-कधी चिंब करणारी पावसाची सर,
तर कधी वाहून नेणारा प्रेमाचा पूर वाटतो.
कधी-कधी पर्वतावर फसफस नारा ज्वालामुखी वाटतो,
तर कधी शम्पिअनच्या बाटलीतून फसफसनार्या शम्पिअनसारखाच नशीला वाटतो.
कधी-कधी पावसाची वाट पाहणाऱ्या मोराच्या ओलसर डोळ्यांप्रमाणे वाटतो,
तर कधी पावसात चिंब भिजलेल्या मोराच्या तोरावर मोत्यांप्रमाणे सजलेल्या ओलसर थेंबाप्रमाणे वाटतो.
असाच तुझ्या ओठांवरती मृगजळ होऊन चमचमणारा हा ओलावा ह्या सुकलेल्या, तहानलेल्या, माझ्या व्याकूळ ओठांना नेहमीच हवा हवा सा वाटतो,
नेहमीच हवा हवा सा वाटतो……